Corona virus | …म्हणून बहिणीची डेडबॉडी आणण्यास गेलेल्या भावाला बसला धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona virus |  देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अनेक लोक मृत्यू पडत आहेत. तर दिल्लीमधील एक हृदयाला धक्का देणारी एक घटना घडली आहे. तेथील एक कुटुंब कोरोनाबाधित असल्याने कुटूंबातील सदस्य हे अलगीकरणात होते. दरम्यानच्या काळात तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला, परंतु, कोरोनामुळे मृतदेह ताब्यात घेता आला नाही. शेवटी एक महिन्याने त्या तरुणीचा भाऊ हॉस्पिटलमध्ये गेला असता मृतदेहच सापडला नसल्याने कुटुंबाला एक हृदयद्रावक धक्का बसला आहे.

अधिक माहितीनुसार, कोरोना बाधित झालेल्या तरुणीचा एक महिन्याआधी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. दीपिका असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत दीपिकाचा शोध न लागल्याने अखेर तिच्या कुटूंबीयाने हॉस्पिटलविरोधात फिर्याद दिली आहे. या दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी सिद्धार्थ अर्थात त्या तरुणीचा भाऊ रुग्णालयात पोहोचला तेव्हा शवगृहात मृतदेहाचा शोध सुरू झाला. मात्र, मृतदेह सापडला नाही. रुग्णालयाने मृतदेह सापडल्यानंतर कळवू असे म्हणत सिद्धार्थला घरी जाण्यास सांगितले. या प्रकारावरून शेवटी त्या तरुणीचा भाऊ सिद्धार्थने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

या दरम्यान, दीपिकाची प्रकृती बिघडल्यानंतर नोएडामधील राम सिंग रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. १५ एप्रिलला तिला कोरोनाची बाधा झाली होती.
अनेक अवधी नंतर त्या तरुणीच्या भावाने लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. दीपिकाचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला.
उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने २ दिवसांनी मृतदेह नेण्यासाठी सिद्धार्थला सांगितलं होत.
परंतु, सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
यामुळे ते सर्व गृह विलगीकरणात होते.

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण