…तर लीक करणार प्रियंका, लेडी गागा, मॅडोनासह ‘या’ बड्या सेलेब्सचा खासगी डेटा ! ‘हॅकर्स’च्या धमकीनं ‘खळबळ’

पोलिसनामा ऑनलाइन –जगात सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अशात आता हॅकर्सही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनावर अ‍ॅटॅक करत आहेत आणि खंडणीची मागणी करत आहेत. अशाच एका प्रकरणात प्रियंका चोपडाही अडकली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, हॅकर्सच्या एका ग्रुपनं न्यूयॉर्कमधील एंटरटेंमेंट लॉ Grubman Shire Meiselas And Snacks ची वेबसाईट हॅक केली आहे. हॅकर्सनं धमकी दिली आहे की, जर एका आठवड्यात 42 मिलियन डॉलर म्हणजे म्हणजेच जवळपास 317 कोटी रुपये नाही दिले तर सर्व सेलिब्रिटींची खासगी माहिती इंटरनेटवर सार्वजनिक केली जाईल. हॅकर्सनं 12 मे रोजी 21 मिलियन डॉलरची मागणी केली होती. परंतु 14 मे रोजी ही रक्कम दुप्पट करण्यात आली. लॉ फर्मनं ही रक्कम देण्यास मनाई केली आहे. अमेरिकन इन्वेस्टिगेशन एजन्सी एफबीआय याचा तपास करत आहे.

आयएनएसच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हॅकर्सनं या फर्ममधील 756 जीबी डेटा चोरी केला आहे. यात कॉन्ट्रॅक्ट, सिक्रेट अ‍ॅग्रीमेंट, फोन नंबर आणि इमेल अ‍ॅड्रेस आहेत. याशिवाय काही खासगी पत्रव्यवहारदेखील हॅकर्सच्या ताब्यात आहे.

सायबर सिक्योरिटी फर्म एमसिससॉफ्टनुसार, या हॅकर्सच्या ग्रुपचं नाव REvil म्हणजे Sodinokibi आहे. अद्याप लॉ फर्मकडून कोणतीही कमेंट जारी केलेली नाही. त्यांची वेबसाईट ऑफलाईन गेली आहे. ओपन केल्यानंतर फक्त लोगो दिसत आहे.

प्रियंका व्यतिरीक्त हे बडे सेलिब्रिटी अडचणीत

हॅकर्सनं दावा केला आहे की, त्यांच्याकडे प्रियंका चोपडा, लेडी गागा, मॅडोना, निकी मिनाज, ब्रुस स्प्रिंग्स्टीन, जेसिका सिम्पसन, इडि मेनजेल, क्रिस्टीना एगिलेरा, माराया कॅरी, मैरी जे ब्लिज, ऐला माई, कॅम न्युटर, बेटर मिडलर, रन डीएमसी आणि फेसबुकची खासगी माहिती आहे.