तर ‘त्यांची’ मुलगी मुस्लिमांच्या घरी ; त्यांना परत कधी आणणार ? : नवाब मलिक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुसलमान लवजिहाद करत असतील, तर सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुलगी आणि अडवाणींची भाची मुस्लिमांच्या घरी आहे त्यांना परत कधी आणणार ?. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. नाशिक येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

नाशिक लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा सिंगयांच्या शापाने करकरेंचा मृत्यू झाला असे सांगते. एका शहीद अधिकाऱ्याबद्दल असे बोलणे लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रज्ञा सिंगला भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. म्हणजे भाजप दहशतवादाबरोबर आहे. असे नवाब मलिक यांनी म्हंटले. याचबरोबर, प्रज्ञा सिंग ठाकुर यांच्या शापाने खरच काही होत असेल तर हाफिज सईद आणि अझहर मसूद यांना शाप दे. देशातील वाईट प्रवृत्तींना शाप दे. असेही त्यांनी म्हंटले. तसेच प्रज्ञा सिंह ठाकुर या साध्वी नाही, तर हत्यारी आहे अशी टीकाही त्यांनी केली.

इतकेच नव्हे तर, बोलतांना लवजिहादच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. मुसलमान लवजिहाद करत असतील, तर सुब्रह्मण्यम स्वामींची मुलगी, भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भाची मुस्लिमांच्या घरी आहे तिला परत कधी आणणार ?. त्यांची घरवापसी कधी करणार. असा सवालही त्यांनी केला. याचबरोबर, दलितांवर राजस्थानमध्ये झेलेला गोळीबार पोलिसांनी नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आसा आरोआपही त्यांनी केला.

Loading...
You might also like