म्हणून त्यांनी आपल्या बाळाचे नाव ‘मिराज’ ठेवले

अजमेर : वृत्तसंस्था – पालकांनी नवीन जन्मलेल्या आपल्या बाळाचे नाव मिराज ठेवले आहे. भारतीय हवाई दलाने बालाकाेट येथे हल्ला करून तेथील दहशतवादी कॅम्प उध्वस्त केले. यानंतर हवाई दलाला आदर आणि सन्मानपूर्व अभिवादन करण्याच्या हेतून त्यांनी आपल्या बाळाचे नाव मिराज ठेवल्याचे समजत आहे. एस एस राठोड असं या बाळाच्या वडिलांचं नाव असून त्यांनी आपल्या बाळाचे नाव मिराज राठोड ठेवले आहे. भारताने पाकिस्तानवर मिराजच्या साहाय्याने हल्ला करत पुलवामा बदला घेतला त्याच्या स्मरणाेत्सवाप्रती आम्ही बाळाचं नाव मिराज ठेवल्याचे बाळाच्या वडिलांनी सांगितले आहे.

एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान बाळाचं नाव मिराज ठेवण्यामागची भूमिका सांगताना बाळाचे वडिल म्हणतात की, “भारताने पाकिस्तानवर मिराजच्या साहाय्याने हल्ला करत पुलवामा बदला घेतला त्याचा स्मरणाेत्सवप्रती आम्ही बाळाचं नाव मिराज ठेवल आहे. आम्हाला आशा आहे की, तो मोठा झाल्यावर सुरक्षा दलात सामिल होईल.” अशी प्रतिक्रिया बाळाच्या वडिलांनी दिली आहे.

असा झाला Air Strike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज – 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.