‘या’ कारणामुळं उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला, HM अमित शहांनी सांगितलं ‘राज’कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत अमीत शहा यांनी खुलासा केला आहे. भाजपने जम्मु-काश्मीर मधील कलम 370 हटविल्यामुळेच उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला, असे अमित शहा यांनी सांगितले. ते कराड येथील सभेत बोलत होते.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी अमित शहा कराडमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून भगवा झेंडा दिल्लीपर्यंत पोहचवण्याचं काम याच भुमीतून झाल्याचे अमित शहांनी म्हटले आहे.

साताऱ्यात झालेल्या सभेत त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत, कलम 370 हटविल्याचं सांगितलं. देशात 300 पेक्षा अधिक जागा जिंकून भाजपचे बहुमताने सरकार स्थापन झाले. अमित शहा यांनी कलम 370 वरुन शरद पवार यांना टार्गेट केलं. साताऱ्यातील नागरिकांना मी विचारू इच्छितो 370 हटवायला पाहिजे होतं की नाही, असा प्रश्न विचारुन शहांनी पवारांना टार्गेट केले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला याचा आनंदच झाल्याचंही शहा यांनी म्हटले.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like