…म्हणून काकानं झाडल्या पुतण्यावर गोळया, महिन्याभराच्या सुट्टीवर आला होता सैनिक ‘संदीप’

पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती वादातून काकाने लष्करात सैनिक असलेल्या आणि सध्या गावी आलेल्या आपल्या पुतण्याला गोळ्या घालून ठार मारले आहे. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गहलेवाला गावात शुक्रवारी (दि.14) दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संदीप सिंह (वय 23, रा. गहलेवाला) असे खून झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर देसा सिंग असे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे.

घुबया पोलिस चौकीचे प्रभारी एएसआय सुरेंद्र निखंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिक असलेला संदीप सिंह एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आला होता. काकूच्या कुटुंबासोबत त्याचा खटला सुरु होता. संदीप या प्रकरणात काका देसा सिंगची मदत मागत होता. त्यासाठी काकूला त्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगत होता. करार नसल्याने संदीपच्या नोकरीला जाण्याचा धोका निर्माण होता. करार न मिळाल्यामुळे संदीपचा काकासोबत वाद झाला. शुक्रवारी सकाळी संदीप आणि त्याच्या काकूच्या कुटूंबातील वादावर पंचायत बोलवली होती. या दोघांच्या वादात पंचायतीमध्येही तोडगा निघाला नाही. त्यानंतर दोघात जोरदार वाद झाला. यानंतर काका देसा यांनी त्याच्या पिस्तुलाने संदीपवर दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी संदीपच्या छातीवर तर दुसरी गोळी डोक्याला लागल्याने यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर काका देसाने धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला आहे.