18 वर्षीय नंदिनीचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नंदिनी ही छत्तीसगडमधील केवळ १८ वर्षांची विद्यार्थीनी आहे. आपल्या शिक्षणासोबतच पर्यावरणाच्या विकासासाठी ती कार्य करते. नंदिनीने १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत शहीद जवानांच्या आठवणीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. नंदीनी सोशल मीडियातही एक्टीव्ह आहे. “#एक पेड शहीदों के नाम” या नावाने तिने आठवड्याची मोहीम सुरु केली आहे. नंदिनीच्या या पर्यावरणवादी विचाराचं आणि संकल्पनेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी १८ वर्षीय नंदिनी दीक्षितचं कौतुक केलं आहे. त्यांनी तिच्या कार्याची दखल घेतली आहे. जावडेकर यांनी नंदीनीचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या तरुणाईच्या कामाचा अभिमान वाटत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवांनांची आठवण ठेऊन पर्यावरण विकासासाठी वृक्षारोपण या संकल्पनेचंही जावडेकर यांनी कौतुक केलंय. नंदिनीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रकाश जावडेकर यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. नंदिनीच्या या कामाबद्दल तिचं सोशल मीडियातूनही कौतुक होत आहे. जावडेकर यांनीही नंदिनीचा फोटो शेअर करत तिच्या कामाचं कौतुक केलंय. तसेच, आपल्या देशाची तरुणाई पर्यावरणाच्या दृष्टीने विचारपूर्वक आणि विकासात्मक क्रिएटीव्ह काम करत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.