…म्हणून अभिनेता विकी कौशल ‘उरी’मध्ये नको होता ‘How’s the josh’ डायलॉग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. प्रेक्षकांनी हा चित्रपट चांगलाच उचलून धरला. या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग हाउज द जोश या डायलॉगबद्दल एक किस्सा नक्कीच तुम्हाला माहीत नसेल. विकी कौशलला हा डायलॉग चित्रपटात नको होता. दिग्दर्शक आदित्य धारने या डायलॉगबाबत एक किस्सा शेअर केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी हाउज द जोश या डायलॉगची आठवण सांगितली.

यावेळी बोलताना आदित्य म्हणाला की, “आम्ही म्यानमारमध्ये चित्रपटाचं शुटींग करत होतो. कॅमेरा रोल होण्यासाठी 2 मिनिट होते. विकी कौशल माझ्याकडे आला आणि त्याने मला हा डायलॉग बदलायला सांगितले. या डायलॉगने तो फील आणि जोश येत नाही असं तो म्हणाला होता. त्यानंतर मात्र मी विकीला समजावले की, जवानांमध्ये उत्साह ऊर्जा आणण्यासाठी सेनेचे अधिकारी असे संवाद सरावादरम्यान वापरत असतात. त्यामुळे तू प्रयत्न कर.” यानंतर विकीने शुटींगदरम्यान तो डायलॉग घेतला तेव्हा सेटवरील उपस्थितांच्या अंगावर शहारे आले असेही त्याने सांगतिले.

आपल्या मुलाखतीत पुढे बोलताना आदित्यने हाउज द जोश या डायलॉगची एक रंजक गोष्टसुद्ध आहे असे सांगितले. हे सांगताना आदित्य म्हणाला की, “माझ्या अनेक मित्रांचे कुटुंबीय सैन्यात होते. त्यामुळे मित्रांसोबत मी खूपदा आर्मी क्लबमध्ये गेलो आहे. ख्रिसमस किंवा नववर्षाच्या संध्याकाळी तिथे काही निवृत्त ब्रिगेडियर यायचे. त्यातले एक ब्रिगेडियर आम्हा सर्व लहान मुलांना रांगेत उभं करायचे आणि हाउज द जोश हा प्रश्न विचारायचे. जो मुलगा सर्वात मोठ्या आवाजात हाय सर असं म्हणेल त्याला त्यांच्याकडून चॉकलेट्स मिळायचे. मी नेहमीच मोठा आवाज करत हाय सर असं म्हणायचो. मला त्यावेळी जास्त चॉकलेट्स मिळायची. काही आर्मी ऑफिसरच्या तोंडी मी हे वाक्य अनेकदा ऐकलंय. म्हणूनच मी ते वाक्य चित्रपटात वापरण्याचं ठरवलं. ते इतकं प्रसिद्ध होईल याची मी कल्पनाही केली नव्हती.” असं तो यावेळी म्हणाला.