अभिनेता सोनू सूदचा प्रश्न, म्हणाला – ‘…तर डॉक्टर Remdesivir लिहूनच का देतात? त्याला पर्यायी मेडिसीन का उपलब्ध होत नाही?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे रेमेडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लिहून दिले जात आहे. मात्र बाजारात ते मिळत नाहीत. यावरून अभिनेता सोनू सूदने प्रश्न विचारला आहे. एखादं इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग प्रत्येक डॉक्टर केवळ त्याच इंजेक्शनची मागणी का करतात. तेच इंजेक्शन का लिहून देतात, असा सवाल त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. जर रुग्णालयाला ते इंजेक्शन मिळत नसेल, तर सर्वसामान्य माणसांना कसे मिळणार. त्या इंजेक्शनला पर्यायी मेडिसीन का उपलब्ध होत नाही, ज्यामुळे लोकांचे प्राण वाचतील असे सोनू सूदने म्हटले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लिहून दिले जात आहे. मात्र, बाजारात ते इंजेक्शन मिळथ नाही. त्यातच इंजेक्शनची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात काळाबाजारही होत असल्याचे समोर आले आहे. 2 इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विक्री केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. नातवाईकांना मनस्ताप करावा लागत आहे. मात्र आता रेमडेसीवीर इंजेक्शनचाही वापर कोरोनाबाधित व्यक्तींच्या उपचारपद्धतीतून वगळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.