मग कलम 370 ‘कायमस्वरुपी’ का केले नाही, PM नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये एक देश एक संविधान आम्ही प्रत्यक्षात आणले. जम्मी काश्मीरमधील ३७० कलम कायमचे हटविले. आता अनेकांना ते अतिशय महत्वाचे आणि चांगले होते असे वाटत आहे. जर त्यांना ते इतके महत्वाचे होते, तर ६० वर्षे तसेच का ठेवले ते कायमस्वरुपी टिकावे म्हणून प्रयत्न का केले नाहीत?, असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्यात त्यांनी सर्वप्रथम काश्मीरमधील कलम ३७० वर भर दिला. ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये आजवर दहशतवाद आणि परिवारवाद जोपासला गेला. ३७० कलमामुळे काश्मीरचा विकास खुंटला होता. जे झाले ते चांगले झाले नाही हे त्यांनाही माहिती होते. त्यामुळेच गेल्या ६० वर्षात त्यांनी तो कायमस्वरुपी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला नाही. पण तो कायमचा हटविण्याचे त्यांच्यात धाडस नव्हते. आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यावर ७० दिवसात ते करुन दाखविले. आता काश्मीरमधील आदिवासी, दलितांना अधिकार मिळणार आहे. काश्मीर आणि लडाख यांनाही विकासाचा हक्क आहे. कलम ३७० हटविल्यामुळे त्यांना तो आता मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like