‘या’ कारणामुळे JCB मशिनला दिला जातो पिवळा रंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेसीबी मशीन बघितला नसेल असा मनुष्य या जगात नाही. अनेक वेळा आपण एखाद्या ठिकाणी जेसीबी मशीनचे काम सुरु असले तर पाहत बसतो. मात्र या मशीनला पिवळा रंगच का दिला जातो असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का ? तर याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

जेसीबी हि मशीन ब्रिटनमधील कंपनीमध्ये बनवली जाते. या कंपनीचे मुख्यालय या देशातील स्टेफर्डशायर या शहरात होते. या ठिकाणी कंपनीचे मोठे मुख्यालय तर होतेच मात्र फार मोठा प्लॅन्ट देखील होता. सुरुवातीला म्हणजेच 1945 मध्ये हि मशीन कोणत्याही नावाविनाच बनवण्यात आली होती. त्यानंतर या मशीनला काय नाव देण्यात यावे यावर मोठा विचार झाल्यानंतर त्याला जोसेफ सायरिल बमफोर्ड यांच्या नावावरून नाव देण्याचे नक्की करण्यात आले. त्यावरीन या कंपनीला जेसीबी हे नाव देण्यात आले.

आजमितीला भारतात सर्वात जास्त उत्पादन होत असून या मशीनचे सर्वात जास्त निर्यात भारतातून होते. सुरुवातीला या मशीनला लाल आणि पांढऱ्या रंगात तयार करण्यात येत असे. त्यानंतर मात्र त्याचा रंग बदलून पिवळा करण्यात आला. त्यामुले आपल्याला कुठंही हि मशीन सहज नजरेस पडते. दरम्यान, रात्र असो किंवा दिवस असो कुठूनही हि मशीन सहज नजरेत येण्यासाठीच या मशीनला पिवळा रंग देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त