पोलीसनामा ऑनलाइन टीम – Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराची उष्णताही वाढते, ती कमी करण्यासाठी आपण अनेक थंड पदार्थ किंवा पेयाचं सेवन करतो (Summer Health Tips). शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण होण्यासाठी, दररोज कमी प्रमाणात सुका मेवा खखाला हवा. सुका मेवा (Dry Fruits Health Benefits) त्वचेसाठी हृदय आणि मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर आहे . पण उन्हाळ्यात मुळातच वातावरण गरम असत आणि सुकामेवा हा उर्जा वाढवणारी फळे आहेत. त्याामुळे ती कमी प्रमाणात खावीत (Soaked Dry Fruits Benefits).
उन्हाळ्यात सुकामेवा हा पाण्यात भिजवून खावा. म्हणजे शरीराला जास्त उष्णता मिळणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, असे काही ड्रायफ्रुट्स देखील आहेत जे भिजवल्यानेतर यांचा वेगळा उपयोग होतो (Soaked Dry Fruits Benefits).
काजू, बदाम, मनुका, पिस्ता, अक्रोड, खजूर आणि अंजीर या व्यतिरिक्त सीताफळाचे दाणे, ताडाचे दाणे, अळशीच्या बिया यांची गणती सुकामेव्याच्या यादीतच होते.
कोणते ड्रायफ्रूट भिजवून खावे (Which Dried Fruit To Eat Soaked) :
तज्ज्ञांच्या मते बदाम आणि अक्रोड (Almond And Walnut) भिजवून खाता येतात.
भिजवल्याने त्यांची ऊब पाण्यात विरघळते. हे भिजवल्यावर यातील उष्णता निघून जाते आणि ते मऊ होतात.
ते पचायला हलके जातात. बदाम आणि अक्रोड मेंदू, हृदय, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.
त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
मनुका भिजवून खाऊ नये (Don’t Eat Soaked Raisins) :
मनुकात जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं, पण ते भिजवून खाऊ नयेत. असे केल्याने त्यांचे पोनी तत्व नष्ट होतात.
मनुका पाण्यात भिजत असतील तर त्यांचे गुणधर्म पाण्यातच विरघळतात, मग ते खाऊन काही फायदा होत नाही.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Soaked Dry Fruits Benefits | eat dry fruits soaked in summer otherwise body heat may increase
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune NCP | बालगंधर्वमधील घटना पुणे शहराच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी – प्रशांत जगताप