Diet tips : सकाळी ‘या’ 7 गोष्टी भिजवून खाल्याने प्रोटीन, आयर्न, कॅल्शियमची कमी दूर होईल; शरीर होईल बळकट

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बऱ्याच लोकांना अन्न शिजवून खाणे किंवा कच्चे खाणे आवडते. परंतू अशा काही गोष्टी आहेत, ज्या जर भिजवून खाल्या तरच आरोग्यास अधिक फायदा होईल. बदाम, चणे, बिया, सोयाबीनसह बऱ्याच गोष्टी भिजल्याने त्यांचे पोषण वाढते. असे मानले जाते की असे पदार्थ भिजल्यावर फायटिक ऍसिडला कमी होते आणि प्रोटीन, आयरन, झिंक आणि कॅल्शियम यासारखे महत्वपूर्ण पोषक तत्व आणि खनिजांमध्ये वाढ होते.

हेच नाही तर यात टॅनिन आणि पॉलिफेनॉल्स कमी होते. अँटी-न्यूट्रीशनल एन्झाइम इनहिबिटर्स कमी करते. गॅस निर्माण करणाऱ्या पदार्थाना कमी करते. पोत सुधारते आणि त्यामुळे अन्न शिजविण्याचा वेळ कमी होतो. आम्ही तुम्हाला असेच काही पदार्थ सांगणार आहोत, ज्यांना भिजवून खाल्ले पाहिजे.

मेथीचे दाणे
मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न, फायबर, मँगनेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, व्हिटॅमिन सी, थायमिन, व्हिटॅमिन-बी६, व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट आणि फायबरसारखे अनेक पोषक तत्वे यामध्ये आढळतात. हे खाल्यास, बद्धकोष्ठता दूर करून आतडयांना स्वच्छ ठेवण्यात मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मेथी देखील फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, त्यांचे सेवन देखील महिलांमध्ये पिरियड दरम्यान वेदना कमी करते.

बेदाणे
बेदाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात. जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे भिजलेले बेदाणे खाल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. तसेच शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते.

जवस
जवसमध्ये व्हिटॅमिन बी ५, नायसिन, राइबोफ्लेवीन आणि व्हिटॅमिन-सी यासह ओमेगा-३ फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी १, प्रोटीन, फायबर यांसारखे पोषक तत्व असतात. याच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

काळ्या मनुका
यामध्ये मँगनेशियम, पोटॅशियम आणि आयर्न मोठ्याप्रमाणात आहे. याच्या नियमित सेवनाने कर्करोगांच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध होतो. त्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. अशक्तपणा आणि किडनी स्टोन असलेल्या रुग्णांना काळ्या मनुका खाणे फायदेशीर आहे.

मूग
यात प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन बी असते. याचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास फायदा होतो. त्यामध्ये पोटॅशियम आणि मँगनेशियमचे प्रमाण जास्त असल्याने डॉक्टर हाय पीबी रुग्णांना नियनमितपणे खाण्यास सांगतात.

काळे हरभरे
हरभऱ्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मँगनेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए, बी,डी यांचे प्रमाण भरपूर असते. याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोल होते, पचनक्रिया सुधारते, वजन कमी होते, कँसर, रक्ताची कमी या समस्यांपासून वाचण्यास मदत होते.

बदाम
यात मँगनेशियम मोठयाप्रमाणत असते. त्यामुळे हाय बीपी असणाऱ्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर आहे. बऱ्याच अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की भिजलेले बदाम नियमित खाल्ल्याने खराब कोलोट्रोलची लेवल कमी होते.