साबणाच्या आतून निघाले 38 लाखांचे सोने, सोशल मीडियावर वायरल झाला व्हिडिओ

नवी दिल्ली : तमिळनाडुच्या तिरुचिरापल्ली एयरपोर्टवर अधिकार्‍यांनी सोन्याची तस्करी करणार्‍यांकडून 38 लाखांचा साबण पकडला आहे. आता तुम्ही सुद्धा विचार करत असाल की, अखेर 38 लाखांचा साबण कसा असू शकतो. परंतु 38 लाखांचा साबण नाही तर 38 लाखांचे सोने जप्त झाले आहेत, ते सुद्धा या साबणाच्या आतमधून.

तस्करांनी साबणाच्या आत सोने लपवले होते, जे सापडत नव्हते. साबण पॅकेटमध्ये सील होते आणि त्याच्या आत सोने ठेवले होते. ट्विटर यूजर ऽऋरळकरळवशी ने या घटनेचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यांनी कॅपशनमध्ये लिहिले, 38 लाखांचा साबण तिरुचिरापल्ली एयरपोर्टवर जप्त करण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय झाला आहे.

साबण कापल्यानंतर अधिकार्‍यांना आतमध्ये सोने सापडले. व्हिडिओ दिसत आहे की, तस्करांनी अतिशय सफाईदारपणे एका प्रसिद्ध ब्रँडच्या साबणाच्या आत सोने लपवले होते. परंतु, एयरपोर्टवर सुरक्षा रक्षकांना सुगावा लागताच या तस्कारांना पकडण्यात आले.

अधिकार्‍यांनी जेव्हा साबण तपासला तेव्हा त्याच्या आतून 38 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. ज्या ब्रेँडचा साबण आहे, त्याची काही वर्षांपूर्वी जाहिरातसुद्धा आली होती की, त्यांच्या साबणाच्या आत गोल्ड क्वाईन लोकांना जिंकण्याची संधी मिळू शकते.

साबण कंपनीच्या याच जाहिरातीशी या घटनेला जोडून पाहिले जात आहे. अनेक लोकांनी व्हिडिओवर विनोदी कमेंट केले आहेत. अनेक युजरने लिहिले आहे की, हाच साबण घेण्याचा सल्ला दिला होता…तर काही लिहित आहेत…हाच साबण खरेदी करू. तर काहींनी लिहिले आहे कंपनीची जाहिरात खरी ठरली आहे.