महिला सामजिक कार्यकर्त्यावर बलात्कार करून बनवला ‘व्हिडीओ’ अन् त्यानंतर वर्षभर केलं ‘लैंगिक’ शोषण

मेरठ : वृत्तसंस्था – सामाजकार्य करणाऱ्या महिलेने एका व्यक्तीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या व्यक्तीने मागिल एक वर्षापासून आपले लैंगिक शोषण केले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. पिडीत महिला मेरठची रहिवाशी असून तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार असून नोकरी देण्याच्या बहाण्याने लखनऊ येथे घेऊन गेला. याठिकाणी लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडीओ बनवला. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने एक वर्षापासून आपले लैंगिक शोषण केले असल्याचे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रकार मेरठ येथील मेडीकल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

सोशल एक्टिविस्ट महिला से रेप कर बनाया वीडियो, 1 साल तक किया शोषण

आरोपीने लैंगिक अत्याचार करताना व्हिडीओ आणि फोटो काढले. त्यानंतर त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीकडे फोटो आणि व्हिडीओ काढून टाकण्यास सांगण्यात आले. त्यावेळी आरोपीने नकार दिला. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पिडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सोशल एक्टिविस्ट महिला से रेप कर बनाया वीडियो, 1 साल तक किया शोषण

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे मेडीकलचे दुकान आहे. त्याने दुकानात बोलावून शितपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक अत्याचार करत असताना आरोपीच्या मित्रांनी फोटो आणि व्हिडीओ काढला. महिलेने मेरठ पोलीस अधीक्षकांकडे याची तक्रार केली असून अधीक्षकांनी या घटेनेचा तपास करण्याचे आदेश मेडीकल पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोशल एक्टिविस्ट महिला से रेप कर बनाया वीडियो, 1 साल तक किया शोषण

आरोग्यविषय वृत्त –