मोदी भेटीचा हट्ट धरणाऱ्या तृप्ती देसाई पुण्यात ताब्यात 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भूूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b6db1c2-d353-11e8-bc73-a5f3af5624ad’]

पुणे पोलीस आज सकाळी साडेसहा वाजताच सहकारनगर परिसरातील तृप्ती देसाई यांच्या घरी पोहचले. त्यांना शिर्डीला न जाण्याविषयी पोलिसांनी समजावून सांगितले. पण त्यांनी पोलिसांचे ऐकायला नकार दिला. शेवटी पुणे पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर जाऊ न देता घरातच थांबवून ठेवले आहे. शबरीमला येथील अयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन आपले म्हणणे त्यांना नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचवायचे होते. त्याचबरोबर भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करुन मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिला आणि मिडियातील महिलांना मारहाण करण्याचा प्रकार झाला होता. त्याचा निषेधही त्या आपल्या कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर रास्ता रोको करुन करणार होत्या.

[amazon_link asins=’B071D22BXY,B07GDP2DRX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’770c48e6-d353-11e8-aca3-bfaef1ed5700′]

त्याबाबतचे पत्र त्यांनी कालच अहमदनगर पोलीस अधीक्षक त्यांना लिहिले होते. जर त्यांनी भेट नाकारली तर वाटेत रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी या पत्रात दिला होता. आम्हाला आंदोलन करण्याचा लोकशाहीने हक्क दिला आहे. आम्हाला त्यांनी घरीच थांबवून ठेवले़, हा आमचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. मोदी शिर्डीत येऊन सुरक्षितपणे साईबाबांचे दर्शन घेणार. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करुन तृप्ती देसाई म्हणाल्या की, आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचे आहे, पण तुमचे तुकडे करुन महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे हिसांचार पसरवणारे आहेत. त्यांना भाजपा पाठिंबा देत असताना मोदी गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांची बोलताना विचारला.

क्रिकेट : सर्वाधिक घोटाळेबाज, सट्टेबाज भारतात