७ लाखांची लाच स्विकारताना समाज कल्याण अधिकारी अ‍ॅंटी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – ७ लाखांची लाच स्विकारताना लातूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी व संस्था सचिवास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे लातूर समाज कल्याण विभागात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र अद्याप कोणत्या कारणाने लाच स्विकारण्यात आली हे समजले नाही.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे (वय ३५) तर, संस्थासचिव उमाकांत तपशाळे (वय ५२ रा. उदगीर) असे लाच स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे व संस्थासचिवाचे नाव आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like