‘फ्रेंड मेकर टूल्स’चा वापर करून तब्बल 50 महिलांना ‘अश्लील’ मेसेज, युवक ‘गोत्यात’

मुंबई : ऑनलाइन पोलिसनामा – सोशल मीडियाची तरुणाईमध्ये क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र कोण त्याचा कसा वापर करेल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापरही सुरु आहे, नुकताच कुलाबा पोलिसांनी एका सचिन लोखंडे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. सचिनने ५० हुन अधिक महिलांना अश्लील संदेश, फोटो आणि व्हिडीओ पाठवले होते.

एका तरुणीला अनोळखी नंबर वरून हाय, हॅलो येत होते तिने समोरील व्यक्ती कोण आहे हे विचारल्यावर समोरच्याने ‘सचिन’ म्हणून नाव सांगितले नंतर त्या व्यक्तीने अश्लील मेसेज पाठवण्यास सुरवात केली. त्या तरुणीने तो नंबर ब्लॉक केला तरीही त्या नंबर वरून मेसेज पाठवणे सुरु होते. शेवटी तरुणीने पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी त्या नंबरचा शोध घेणे सुरु केले.

पोलिसांनी साकीनाका येथून सचिन याला ताब्यात घेतल्यावर त्याने हे मेसेज पाठविल्याचे कबूल केले. सचिनची सखोल चौकशी केली त्यावेळी त्याने एक दोन नव्हे तर तब्बल पन्नासपेक्षा अधिक महिलांचा अशाप्रकारे छळ केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त करून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे. फॉरेन्सिक लॅबमधून डेटा आणि नंबर मिळाल्यानंतर त्या महिलांनाही बोलाविले जाणार असून त्यांना साक्षीदार केले जाईल, अशी माहिती कुलाबा पोलिसांनी दिली.

‘फ्रेंड मेकर टूल्स’ या अँपच्या माध्यमातुन सचिन ज्या प्रोफाइल वर मुलीचा फोटो असेल अशांनाच मेसेज पाठवत असे, कित्येकदा सचिनकडून पुरुषांनाही मेसेज पाठवले असल्याचे उघड झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –