धक्कादायक ! ‘सोशल’वरील मित्रानेच लुटली तिची ‘आब्रु’ ; ‘बलात्कार’ करून अश्लील फोटो पतीच्या WhatsAppवर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मिडियावरुन झालेला मित्र पती नसल्याचे पाहून उत्तर प्रदेशातून तिच्या घरी आला व तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे अश्लिल फोटो त्याने पतीच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी दिघी रोडवरील एका २७ वर्षाच्या महिलेने भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी बादशहा ऊर्फ रतीन गुप्ता (रा. सतनाम, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केवळ सोशल मिडियावर झालेली ओळख इतकीच माहिती असताना एखाद्याला घरात घेऊन त्याला रात्री मुक्कामाला ठेवणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेची सोशल मिडियावर ओळख झाली होती. या ओळखीवरुन तो २२ मार्च रोजी तिच्या आदर्शनगर येथील घरी आला. रात्री उशीर झाला म्हणून तिने त्याला घरीच थांबवून घेतले. मध्यरात्री ते बेडरुममध्ये शेजारी बसून बोलत बसले असताना या महिलेला तुझ्या नवऱ्याने सोडल्यानंतर तुझ्याशी लग्न करेल, असे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

अर्धनग्न अवस्थेतील फोटो व दोघांनी एकत्र काढलेले फोटो हॅलो अ‍ॅपवर अपलोड केले व ते फोटो त्याने तिच्या पतीच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले. त्यावरुन पतीपत्नीत भांडणे झाली. त्यानंतर या महिलेने आपली बदनामी केली म्हणून बादशहा ऊर्फ रतिन गुप्ता याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

Loading...
You might also like