सोशल मीडियात ४ ते ५ टक्के मते फिरवण्याची ताकद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. सोशल मीडियामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर ४ ते ५ टक्के परिणाम होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाचा अत्यंत कल्पक आणि प्रभावी वापर करत अनुकूल आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं. आणि ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. ही सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे.

निवडणुकीतील सोशल मिडीयाच्या प्रभावाबाबत माहिती देताना सोशल मीडिया तज्ज्ञ टी. व्ही. मोहनदास पै म्हणाले आहे की , ‘ तरुण मतदारांपैकी ४० ते ५० टक्के मतदारांच्यावर सोशल मीडियाचा प्रभाव पडतो. कारण त्यांच्या माहिती मिळवण्याच्या माध्यमांच्यामध्ये सर्वाधिक भर हा सोशल मीडियावर असतो. तरुण मतदार तसेच पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे युवक मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर क्रियाशील असतात. अगदीच काठावर ज्याठिकाणी निकाल लागतील विशेषत्वाने त्या ठिकाणी सोशल मीडियाचा प्रभाव राहील . तरुण टीव्ही बघत नाहीत, तर ते व्हिडीओ बघतात. ते यूट्यूबचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. तसेच ते सोशल मीडियावर काय शेअर होत आहे. तेच जास्त प्रमाणात पाहतात. त्यामुळे हे तरुण जे काही सोशल मीडियावर पाहतात त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडत असतो. ‘

सोशल मीडियाचा वापर प्रचारखर्चात धरणार –

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना आचारसंहिता आणि निवडणूक काळासाठी बनविण्यात आलेल्या नियमावलींची माहिती दिली. तसेच यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरावरही आयोगाची करडी नजर असणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकउंटची माहिती आयोगाला द्यावी लागणार आहे.

ह्याहि बातम्या वाचा-

पक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच

राजीनामा देणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील 4 अप्पर पोलीस आयुक्‍तांच्या बदल्या

मृत्यूनंतरही फेसबुकवर राहा जिवंत

माढ्याचा तिढा : स्वाभिमानीने आघाडीकडे केली माढ्याची मागणी