ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी ‘या’ गोळ्या करतात मदत?, जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचे मृत्यूही झाला आहे. अशा या संकट काळात इतर ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करुन करुऩ देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून यात हे औषध घेतल्यास ऑक्सिजन लेवल वाढेल असा दावा करण्यात आला आहे.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे? मग ऑक्सिजन मिळण्याची वाट पाहू नका. त्रिलोक्यचिन्तामणी रस 1-1 गोळी दिवसातून 3 वेळा घेतल्यास ऑक्सिजन लेवल तात्काळ सुस्थितीत येईल. हे एक आयुर्वैदिक औषध आहे. ऑक्सिजन शोधण्यात वेळ वाया घालवू नका असे म्हटले आहे. त्यावर आयुष मंत्रालयाने या मेसेजचा फोटो ट्विट करुन म्हटले आहे की, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या औषधाचा उल्लेख करणारी एक पोस्ट व्हायरल होत आहे, हे औषध घेतल्यास ऑक्सिजनची पातळी त्वरित वाढेल, असा दावा यात केला आहे. मात्र, हे अनव्हेरिफाय स्त्रोत्रांद्वारे प्रकाशित केले आहे. आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, आयुष मंत्रालय अशा अनव्हेरिफाय स्त्रोत्रांनी प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही जाहिरातीचे समर्थन करत नाही. कृपया गंभीर परिस्थितीत कुठलेही औषध स्वतःहून घेऊ नका. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावे, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.