Tandav सीरिजमध्ये भगवान शंकराची खिल्ली उडवल्यानं सोशलवर भडकले युजर्स, म्हणाले – ‘इतर धर्मांसोबत असं कराल का ?’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडियावर याला विरोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. असाही दावा केला जात आहे की, ही सीरिज जेएनयुच्या कथित टुकडे टुकडे गँगचं समर्थन करत आहे.

कोणत्या सीनला होतोय विरोध ?
वेब सीरिजमधील एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कॉलेजमध्ये सुरू असणाऱ्या एका प्लेमध्ये मोहम्मद जीशान अयुब शंकराची भूमिका साकारताना दिसत आहे. परंतु हे खूप मजेदार अंदाजात दाखवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर तो शिवी देतानाही दिसत आहे.

https://twitter.com/ankita_thakur2/status/1349933156044922881?s=20

नेटकऱ्यांनी घेतला समाचार

एका युजरनं सोशलवर लिहिलं की, अली अब्बास जफर तांडवचे डायरेक्टर आहेत, जी पूर्णपणे त्यांच्या लेफ्ट विंग प्रोपेगेंडावर आधारीत आहे, टुकडे टुकडे गँगचं समर्थन करते. जीशान अयुब शंकराच्या भूमिकेत स्टेजवर शिवी देताना दाखवण्यात आलं आहे. तांडवचा बहिष्कार करा.

आणखी एका युजरनं लिहिलं की, मला तिरस्कार पसरवायचा नाहीये. मी हिंदू आहे आणि आम्ही खूप शांतीप्रिय लोक आहोत. परंतु या ओटीटी प्लॅटफॉर्मची हिंदू धर्माची चेष्टा करण्याची हिंमत कशी झाली. ते असं इतर धर्मांसोबत करू शकतात का.

https://twitter.com/ChastainxMargot/status/1349991355087392769?s=20

एका युजरनं असंही लिहिलं की, तांडव बॉलिवूडची एक कट्टरता आहे. हिंदू देवतांची चेष्टा करणं, तेच घाणेरडे विनोद, टुकडे टुकडे गँगचे डाव्या पंथाचे अजेंडे पुढे नेणं. सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. हे आपलं कल्चर, ट्रॅडिशन आणि मूळ आहे.

https://twitter.com/kingkane05/status/1349993818590887938?s=20

एकानं लिहिलं की, डियर प्राईम व्हिडीओ तुम्ही जेएनयुच्या टुकडे टुकडे गँगचं समर्थन करण्यासाठी एवढे पैसे का खर्च केले. प्लिज क्रिएटीविटी आणि आर्टच्या नावावर प्रोपेगेंडा करणं बंद करा.

https://twitter.com/Viratholic_Kity/status/1349990759793999872?s=20

एकाचं असं म्हणणं होतं की, मला नाही कळत की बॉलिवूड कायमच का हिंदुइजम आणि हिंदू देवतांना टारगेट का करतं. आमचे देव आमचा धर्म मनोरंजनासाठी नाहीये. ते इतर धर्मांसोबत (इस्लाम/क्रिस्चियनिटी) सोबत असं करू शकतात का. हे खूप लाजिरवाणं आहे.