WhatsApp वापरणं मानसिक आरोग्यासाठी चांगलं, संशोधकांचा निष्कर्ष

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आजच्या या डिजिटल युगात तरुण वर्ग अनेक तास सतत सोशल मीडियावर ऑनलाईन असतात. त्यामुळे अनेकदा घरच्यांचा ओरडा देखील खावा लागतो. आरोग्यावर याचा वाईट परिणाम होईल अशा प्रकारे देखील आपल्याला समजावले जाते. मात्र आजची तरुण पिढी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तासनतास मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त असते. मात्र आता त्यांच्यासाठी खुशखबर असून सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे आरोग्यासाठी घातक नसून हे फायदेशीर असल्याचे संशोधनात समोर आले आहे. यामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य उत्तम राहते असा शोध या नवीन संशोधनात लागला आहे.

या संशोधनात असे पुढे आले कि, ज्या मेसेजिंग ऍपमध्ये तुम्ही ग्रुप चॅटिंग करू शकता त्या ऍपच्या वापरामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ग्रुप चॅटिंगमुळे तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवत नाही त्याचबरोबर तुम्ही यामुळे आत्मविश्वास पूर्ण राहता. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहता. आणि याचा प्रभाव तुमच्या मानसिकतेवर पडतो. त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे सोशल मीडियावर वेळ घालवत असला तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या संशोधना विषयी बोलताना एका प्राध्यापकाने सांगितले की, आरोग्यासाठी सोशल मीडियाचा वापर चांगला की वाईट यावर नेहमी वाद होत असतात मात्र यामध्ये नागरिकांना ज्या प्रमाणात याचा धोका वाटतो तितक्या प्रमाणात हा नाही, त्यामुळे तुम्ही संतुलित प्रमाणात तुम्ही हे वापरले तर नक्कीच तुमच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होतो.

दरम्यान, या संशोधनात २०० नागरिकांचा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये हे सर्व जण दिवसाला सरासरी १ तास व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असल्याचे या संशोधनातून पुढे आले. त्यामुळे त्यांचे आरोग्य हे चांगले असल्याचे यातून सिद्ध झाले.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like