Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा

दुबई : वृत्तसंस्था –  Social Media | आपल्या लाईफ पार्टनर (Life Partner) च्या प्रायव्हसीची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे, अन्यथा महागात पडू शकते. दुबईत (Dubai) राहणार्‍या एका महिलेच्या बाबतीत सुद्धा असेच घडले आहे. स्थानिक न्यायालयाने या 40 वर्षीय महिलेवर सुमारे 41 हजार रुपयांचा दंड लावला आहे. पतीच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड केल्याच्या आरोपात महिला दोषी आढळली आहे. या महिलेने आपल्या पतीचा फोन नंबर आणि छायाचित्रे इंस्टाग्रामवर (Instagram, Social Media) शेयर केली होती, ज्यानंतर प्रकरण न्यायालयात पोहचले.

 

पतीने पोलिसात केली होती तक्रार

 

खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोलिसांच्या चौकशीत समजले की, महिलेने आपल्या पतीसोबत अखरेच्यावेळी जानेवारीत झालेल्या चॅटची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर (Social Media) अपलोड केली होती.ज्यानंतर पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले.
पतीने आरोप केले की, पत्नीच्या या पावलाने त्याच्या प्रायव्हसीचे उल्लंघन केले आहे.
मात्र, पत्नीने न्यायालयासमोर तिच्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले.

 

अगोदर केला बचाव, नंतर गुन्हा कबूल केला

 

पत्नीने आपल्या बचावात म्हटले की, ती आपल्या फ्लॅटवर होती आणि फोनवर एका अ‍ॅपद्वारे आपल्या पतीच्या बहिणींसोबत घटस्फोटाच्या भत्त्यावर चर्चा करत होती.
तिला माहिती नव्हते की, हे सर्व कसे झाले.महिला आणि तिच्या पतीची घटस्फोटाची केस सुद्धा सुरू आहे.
मात्र, नंतर पत्नीने कोर्टाच्या समोर स्वीकरले की, तिने इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर आपल्या मुलांची छायाचित्रे आणि पतीसोबत झालेले चॅट शेयर केले होते.

 

महिला म्हणाली, वाटले नाही कोर्टात जाईल प्रकरण

 

पत्नीने म्हणाली की, तिला महित नव्हते की, इतक्या छोट्या गोष्टीवरून प्रकरण कोर्टापर्यंत जाईल. प्रकरणाच्या चौकशीनंतर कोर्टाने आदेश देत पत्नीवर 41 हजार रुपयांचा दंड लावला.
तर तक्रारदार पक्षाने दोषी पत्नीविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. पीडित पतीने न्यायालयात सांगितले की, पत्नीच्या या पावलाने त्याच्यावर मोठा आघात झाला आहे.
सोबतच त्याच्या गोपनीयतेचे सुद्धा उल्लंघन झाले आहे. यासाठी पत्नी कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.

 

Web Title : Social Media | woman fined for posting messages with husband on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh |’गायब’ झालेल्या परमबीर सिंह यांचा सुगावा लागला, ‘या’ शहरात असल्याची माहिती?, असा सापडला पत्ता

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

Matchbox Price | 14 वर्षानंतर महागणार ‘काडेपेटी’, दुप्पट होतील दर; उत्पादकांनी सांगितले ‘हे’ कारण