Social Media | महिलेची ऑफर ! 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा, 72 हजार घ्या

नवी दिल्ली : Social Media | न्यूयॉर्कच्या एका महिलेने आपल्या सासूसाठी एक अशी जाहिरात दिली आहे, जी सोशल मीडिया (Social Media) साईट रेडिटवर वायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये महिलेने डिमांड केली आहे की तिला तिच्या सासूसाठी बॉयफ्रेंड पाहिजे. दोन दिवसासाठी सासूसोबत राहण्यार्‍या या व्यक्तीला 72 हजार रुपये दिले जातील.

न्यूयॉर्कच्या हडसन व्हॅलीतील एका महिलेने क्रेगलिस्टवर दिलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, तिला आपल्या 51 वर्षीय सासूसाठी एक जोडीदाराची आवश्यकता आहे, जो तिच्यासोबत विवाह आणि डिनरमध्ये सहभागी होऊ शकतो. दोन दिवसापर्यंत त्याला सासूसोबत राहावे लागेल, ज्यासाठी ती त्याला एक हजार डॉलर म्हणजे 72 हजार रुपये देईल.

Social Media | woman offer be mother in law boyfriend for 2 days take 72 thousand

कारण, या महिलेला एका विवाह सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, आणि तिला आपल्या सासूला सुद्धा सोबत न्यायचे आहे. तिला वाटते की, या विवाहाच्या पार्टीत सासूसुद्धा सुंदर कपड्यांमध्ये एका कपलप्रमाणे दिसावी.

जाहिरातीत लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये हडसन व्हॅलीत एका विवाहासाठी शुक्रवारी सायंकाळपासून
शनिवार सायंकाळपर्यंत माझ्या सासूसाठी बॉयफ्रेंडचा शोध घेत आहे. त्याला दोन दिवस सासूसोबत राहावे लागेल आणि तिची काळजी घ्यावी लागेल.

या जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, सासू सफेद रंगाचे कपडे घालेल. भाड्याने घेतलेल्या व्यक्तीला तिच्यासोबत एका जोडप्यासारखे नाटक करावे लागेल. दोन दिवसासाठी असे केल्याने कुणीही एक हजार डॉलर कमावू शकतो.

जाहिरातीत म्हटले आहे की, या सोहळ्यासाठी तिला अशा व्यक्तीची आवश्यकता आहे ज्याचे वय 40 ते 60
वर्षाच्या दरम्यान असेल. तो चांगला डान्सर असेल आणि चांगले बोलत असेल.

रेडिटवर ही जाहिरात शेयर झाल्यानंतर यूजर्सने कमेंटचा भडीमार केला आहे. काहींनी लिहिले आहे की, हे
मस्तच आहे, तर एका यूजरने तर एका व्यक्तीसाठी शिफारस सुद्धा केली आहे.

एका महिलेने म्हटले आहे की, जेव्हा मी हे वाचले, तेव्हा मी ताबडतोब माझ्या पतीबद्दल विचार केला. आणखी
एकाने लिहिले आहे की, हे अवघड आहे, परंतु कधी-कधी हे ठिक आहे. हा एक अतिशय योग्य सौदा आहे,
भोजन आणि प्रवासाचे पैसे वेगळे मिळत आहेत, यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते.

हे देखील वाचा

Breast Milk | ‘या’ 10 कारणांमुळे ‘ब्रेस्टमिल्क’ची निर्माण होते कमतरता, बाळाला नाही मिळत पुर्ण पोषण; जाणून घ्या

Chandrakant Patil | .मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ माणूस ‘ईडी’च्या रडारवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नाव

MLA Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकर यांना अटक; BJP आमदार म्हणाले – ‘पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Social Media | woman offer be mother in law boyfriend for 2 days take 72 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update