लग्न मंडपामधे OBC जनजागृतीचे पोस्टर लाऊन दिला सामाजिक संदेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेली अनेक वर्ष ओबीसी समाज न्याय हक्का साठी लढत आहे 90 वर्षे सातत्याने ओबीसी समाज जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकार दरबारी मागणी करत आहे, आंदोलने, रॅली काढत आहे पण सरकार ओबीसी समाजाची दखल घ्यायला तयार नाही.

याच पार्श्वभूमीवर शहापुर तालुक्यातील दहिवली (पाड़ा) येथे काल एक दिमाखदार लग्न सोहळा पार पडला या लग्नाचे वैशिष्ट म्हणजे जनार्दन लड़कू पाटिल यांनी आपली कन्या दुर्गा जनार्दन पाटिल आणि आपले जावई वीरेंद्र वसंत घुड़े यांच्या चक्क लग्न मंडपामधेच ओबीसी जनजागृति आणि ओबीसी जातनिहाय जनगणना या विषयावरील पोस्टर लाऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

गेली अनेक वर्ष ओबीसी समाज न्यायाच्या प्रतिक्षेत गेली 90 वर्षे सातत्याने ओबीसी समाज आंदोलन, मोर्च्या करत आहेत ओबीसी समाजाने एकजुट व्हावे आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना न्याय मिळवून द्यावा असे जनार्दन पाटिल यांनी आव्हाहन केले. या लग्न सोहळ्यामधे पोस्टर लावण्यासाठी उमेश पाटिल, किशोर पाटिल आणि त्यांचे सहकारी यांनी संकल्पना राबविली.

लग्नसोहळ्यासाठी जमलेल्या मंडळींना उमेश पाटिल यांनी ओबीसीं जनगणना संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी शाहापुरचे आमदार दौलत दरोडा, दशरथजी तीवरे, नंदकुमार मोगरे, जैतु दादा भोईर, दत्तात्रय पाटिल, भाऊ दरोडा, प्रशांत भोईर, दिवा-शिवसेना नगरसेवक सीताराम माधवी, टी. डी. सी. मॅनेजर संतोष घुड़े, महाराष्ट्र पोलिस भाऊ घुड़े तसेच अनेक मान्यवर मंडळीनी उपस्तिती दाखवून शुभेच्छा दिल्या.