‘WhatsApp’चा वापर हे आरोग्यासाठी ‘वरदान’, ‘संशोधकां’चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हा दिवस रात्र सोशल मिडियावर एक्टिव राहत असाल आणि त्यामुळे तुम्हाला घरातले कोणी ओरडत असले तर तुमच्यासाठी एक आनंदवार्ता आहे. एका शोधात दावा करण्यात आला आहे की व्हाट्सअ‍ॅपचा अधिक वापर केला जात असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हा शोध इंटरनॅशनल जर्नल ऑफ ह्युमन कंप्युटर स्टडीजमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, टेक्स्ट मेसेजिंग अ‍ॅप वर ग्रुपमध्ये अधिक चॅटिंग केल्याने मानसिकतेवर सकारात्मक प्रभाव पडतो.

चॅटिंगचा मानसिकतेवर प्रभाव –

हे संशोधन ऑनलाइन चॅटिंगचा मानसिकतेवर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आला. संशोधनात समोर आले की व्हाट्सअ‍ॅपवर अक्टीव राहणाऱ्या व्यक्तींना एकटेपणा येत नाही. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की सोशल मिडियावर मित्रमैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी चॅटिंग करणारे लोक एकमेकांबरोबर उत्तम संबंध ठेवतात.

चॅटिंग करणारे मित्रांच्या आणि कुटूंबाच्या जवळ
या रिपोर्ट बद्दल बोलताना एड हिल युनिवर्सिटीच्या प्रोफेसर लिंडा म्हणाल्या की, सोशल मिडियासंबंधित अनेक चर्चा समोर येतात की सोशल मिडिया तुमच्यासाठी चांगलाय आहे अथवा नाही. परंतू आपण जसे विचार करतो तसे असेलच असे नाही. संशोधनात समोर आले आहे की, सोशल मिडियावर जास्त वेळ घालवणार वापरकर्ते मित्रांच्या आणि कुटूंबाच्या जवळ येतात. अशाने संबंध अधिक मजबूत होतात.

संशोधनात सांगण्यात आले आहे की यात चॅटिंग ग्रुप सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतात. कारण एकाच ग्रुपवर अनेक प्रकारचे लोक असतात. ज्यात लोक अनेक विषयांवर संवाद साधतात. या संशोधनात २०० लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. ज्यात १५८ महिला आणि ४२ पुरुष होते. संशोधनात सहभागी वापरकर्त्यांचे वय २४ वर्ष होते. हे लोक प्रत्येक दिवशी सरासरी ५५ मिनिट तरी व्हाट्सअ‍ॅप वापर होते.

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने घालवा राग आणि तणाव