‘Twitter’चा मोठा निर्णय, ‘या’ लोकांसाठी ‘अडचणी’ निर्माण होणार, मिळणार नोटिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे आलेली माहिती किंवा बातमी ताबडतोब आपल्या मित्रांना, नातेवाईकांना कळवायची असेल तर सोशल मिडीया हे महत्वाचे साधन आपल्या हाती आले आहे. परंतु या माध्यमाचा वापर करून चुकीचे आणि धोकादायक मेसेज, प्रक्षोभक मजकूर देखील पोस्ट केले जातात. आता अशा प्रक्षोभक मजकुरावर आळा घालण्यासाठी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने एक मोठा निर्णय घेतला आहे.

ट्विटरने सांगितले की, प्रक्षोभक मजकूर ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या युजर्सवर कंपनीकडून बारीक लक्ष्य ठेवण्यात येईल. लोकप्रिय नेता, व्हेरिफाइड अकाउंट आणि १ लाखापेक्षा जास्त फॉलोअर असणारे अकाउंटवर विशेष लक्ष्य ठेवण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या युजर्सना नोटीस पाठवण्यात येईल. ही नोटीस नोटिफिकेशनच्या स्वरूपात युजरला मिळेल. अकाउंटवर लक्ष्य ठेवण्यासाठी एक विशेष टीम देखील तयार करण्यात आली आहे. या टीम मध्ये स्थानिक अधिकाऱ्याचा समावेश असेल.

गेल्याच महिन्यात ट्विटरने फेक अकाउंटवर कडक पाऊले उचलत १,६६,५१३ अकाउंट बंद केले होते. अकाउंट बंद केल्यानंतर जीरो टॉलरेंस पॉलिसी इन्फर्मेशन यानुसार हि कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरने सांगितले होते.

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने घालवा राग आणि तणाव