‘कोरोना’ योध्दाचा वाढदिवस अन् धान्य किटचं वाटप

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संक्रमणाच्या काळात गेली चार महिने अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिस प्रशासनातील कोरोना योध्द्यास आपले वैयक्तिक आयुष्य जगता आले नाही परंतु जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले आपले पोलिस बांधव हे सुध्दा समाजाचाच एक घटक आहेत याच भावनेतून आज लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे व त्यांचे सहकारी खंडू गावडे गणेश गावडे आंणि आनंद वैराट यांनी पंन्नास गरजूंना धान्याचे कीट वाटप केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी आली या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस कर्तव्यावर हजर रहावे लागते या काळात अनेकांना कोरोनाची लागण झाली. तरीही हे कोरोना योध्दे आपले काम चोख बजावत आहेत. थेऊर पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांचे सहकारी नितीन सुद्रीक, गणेश कर्चे आदी सहकारी यांनी या भागात आपले काम चोख केले.आज सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारुती कांबळे व त्यांचे सहकारी खंडू गावडे व गणेश गावडे आनंद वैराट यांनी थेऊरमधील पंन्नास गरजूंना धान्याचे कीट त्यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी संदीप कांबळे व पोलिस नाईक नितीन सुद्रीक यांना कोरोना योध्दा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष गायकवाड, आत्माराम खेंडकर आदी उपस्थित होते.