शिंदवणे येथे गरजूंना दिले अन्नधान्याचे कीट

उरुळीकांचन : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मागिल दोन महिन्यापासून देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकांच्या हातालाकाम नसल्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दिवसभर काम करून सायंकाळी चूल पेटवायची अशी परिस्थिती असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदत नव्हे, तर कर्तव्याच्या भावनेतून दानशूरांनी मदत केली पाहिजे, अशी भावना शिंदवणे (ता. हवेली)चे सरपंच अण्णा महाडिक यांनी व्यक्त केले. महाडिक यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिंदवणे येथे गरजूंना शरद भोजन योजनेच्या वतीने धान्य वाटप केले आहे. शिंदेवणे येथे ग्रामपंचायत सदस्य किर्ती कांचन, उरुळी कांचन ग्रा. पं. सदस्य सागर कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन यांच्या उपस्थितीत २०५ गरजूंना धान्य देण्यात आले. सरपंच महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र परिवाराने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून निराधार, विधवा, परित्यक्तांसह परप्रांतीय नागरिकांना मोफत किराणा साहित्याचे किट दिले. त्यांचेही सरपंच महाडिक यांनी अभिनंदन केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like