‘कोरोना’मुळे धोबी समाजावरही आर्थिक संकट : अशोक चौधरी

पुणे : कोरोना विषाणू्च्या महामारीमुळे मागिल अडीच महिन्यांपासून देशभर लॉकडाऊन आहे. धोबी समाजाचा व्यवसायही ठप्प झाला असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. धोबी समाजासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी पुण्यातील धोबी समाज एकता बहुउदेशिय सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष किशोर रामदयाल परदेशी, राजन चौधरी, राजेंद्र परदेशीमा, महेश कनिजिया, प्रेम परदेशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चौधरी म्हणाले की, लॉकडाऊनचा फटका धोबी समाजातील व्यावसायिकांना बसला आहे. दुकान आणि घरभाडे, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे. मागिल अडीच महिन्यापासून धोबी व्यावसायिक हतबल झाले आहेत. तरीसुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजूंना मदतीचा हात पुढे करून गरजूंना अन्नधान्य दिले आहे. त्याचबरोबर पुणे पोलीस दलाच्या सोबत मदत करून गरजूंना कपडे आणि जेवण असे उपक्रमही हाती घेतले. पुण्यामध्ये ड्रायक्लिनिंग, धोबी घाटावरील कर्मचारी आणि व्यावसायिकांचीही संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. काही लाँड्री व्यावसायिकांच्या दुकानामध्ये चार-दहा कर्मचारी काम करीत आहेत. धोबी व्यावसायिकांबरोबर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबा खर्च अवलंबून आहे. आता कर्मचाऱ्यांचे पगारही करता येत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. राज्यभरातील धोबी समाज शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like