माजी मंत्री शिवतारे यांच्याकडून नीरेतील डॉक्टरांंना पीपीई किटचे वाटप

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन –  पुरंदर- हवेली तालुक्यात वैद्यकिय सेवा बजावित असलेल्या डॉक्टरांना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पीपीई किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती प्रा.डॉ. गोरखनाथ माने यांनी दिली.

नीरा (ता.पुरंदर) येथील खाजगी सात डॉक्टरांसह नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना नुकतेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पीपीई किटचे वाटप पुरंदरचे उपसभापती प्रा.डॉ. गोरखनाथ माने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पुरंदरचे माजी सभापती अतुल म्हस्के, नीरा शहर शिवसेना प्रमुख केशव बंडगर, शिवसैनिक दयानंद चव्हाण उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like