स्वच्छता दूत मानवतेच्या मंदिरातील पुजारी

पुणे : स्वच्छता दूत हे मानवतेच्या मंदिरातील स्वच्छतेचे पुजारी आहेत. आपले आणि शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छता दूत काम करीत आहेत. कोरोना विषाणूच्या भीषण परिस्थितीतही त्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम सुरू ठेवले आहे. देशाच्या सीमेवर राहून सैनिक काम करतात, तसेच स्वच्छता दूतही आज कार्यरत आहेत. स्वच्छता दूत खऱ्या अर्थाने कोरोनायोद्धे आहेत, असे मत पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा सावंत यांनी व्यक्त केले. हडपसर गाडीतळ येथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय काँग्रेसचे खासदार राजीव गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सावंत यांनी स्वच्छता दुतांना फळे वाटून आनंद साजरा केला. याप्रसंगी पुणे महापालिकेच्या वैशाली फुंदे आणि कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.