कोरोना घालव रे ! विठ्ठलाला भक्तांचे साकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपनगर आणि परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त काकडाआरती, भजन, कीर्तन भल्या पहाटे मोजक्याच मंडळींमध्ये करण्यात आले. त्यानंतर मंदिरेसुद्धा बंद करण्यात आली. मात्र, भाविकांनी मंदिराच्या पायरीवर डोकं ठेवून पांडुरंगाचे दर्शन घेत कोरोनाचे विघ्न घालव रे बाबा असे विठ्ठलाला साकडं घालण्यात आले.

विठ्ठलनगर (15 नंबर) येथील रामचंद्र विठोबा तुपे विठ्ठल मंदिरामध्ये भल्या पहाटे रामदास तुपे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे, पुष्पा थोरात, राजेंद्र राऊत, भाऊसाहेब वीर, सचिन भाडळे, संदीप मोरे, संजना तुपे, कार्तिक तुपे, ओंकार तुपे, किरण रोहिटे आणि परिसरातील महिला-पुरुष मंडळी उपस्थित होते.