नागरिकांनी वेळीच उपचार करून घ्यावेत : अमृत पठारे

पुणे : प्रतिनिधी –   कोरोनाविषाणूची भीती बाळगण्याऐवजी त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण एकमेकांना धीर दिला पाहिजे. विशेष करून लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे. कोणताही आजार अंगावर काढू नका, वेळीच उपचार करून घ्या, असा सल्लाही शिवसेना शिवअंगणवाडीच्या जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी दिला.

खेड तालुक्यातील मरकळ, कोयायी, कडूस फाटा, चांडोली या गावांमध्ये शिवसेना शिवअंगणवाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सारिका सावंत-थडाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संघटिका अमृत पठारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लहान मुलांना खाऊ आणि सुमारे 500 शेतकऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवअंगणवाडीच्या उपाध्यक्षा रंजना कुलकर्णी, अलका सोनवणे, संगीता फपाल, शीतल हरगुडे, वर्षा ठाकरे, सीता जाधव, संगीता सातव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.