आधुनिक ‘सावित्री’ जी करते आहे ‘कोरोना’तही शिक्षणाची ‘वारी’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगभर घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याची झळ सर्वच क्षेत्राना बसली असून त्यातुन शिक्षण क्षेत्र देखील अपवाद ठरलेले नाही. कोरोना विषाणूचा फटका शिक्षण क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे त्यादृष्टीने शासकीय स्तरावरून अनेक संकल्पना व उपाययोजना सुरू करण्यात झाल्या त्यात ऑनलाईन शिक्षण, झूम मिटिंग, गुगल मिट याप्रमाणे अनेक उपाययोजना राबवत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी देखील आज ही अनेक गावात, वाड्यावस्तीवर स्मार्टफोन,अँड्रॉईड टी व्ही एवढेच नव्हे तर मोबाईलला कवरेज रेंज देखील उपलब्ध नाही अशा ठिकाणच्या मुलांना कोणत्या पद्धतीने शैक्षणिक प्रवाहात आणावे हाच एक मोठा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत निंबाळे ता चांदवड येथील जिल्हा परिषदेच्या गांगुर्डे वस्तीशाळेच्या श्रीमती रुपाली गवळी या शिक्षीकेने या गरीब मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहचेल तसेच अशिक्षित पालक व गरिबीची परिस्थिती असलेली मुले यांना शिक्षणाच्या प्रहवात कसे आणता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत “मुलांच्या घरी शिक्षण” हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे.

वस्तीवरील अनेक पालकांकडे मोबाईल नाहीत.सदन कुटुंबातील पालकांच्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल असला तरी रेंज अभावी ऑनलाईन मीटिंग करतांना अडथळा येतो. तसेच अनेक पालक शेतात असल्याने मुलांना मोबाईल मिळत नसल्याने यावर मात करत आपल्या मुलांपर्यंत थांबलेले शिक्षण सुरु करण्यासाठी स्वखर्चाने सर्व शैक्षणिक साधनांचे झेराँक्स काढून त्याचे एकत्रीकरण करुन शाळेतील सर्वच मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधून दोन ते पाच विद्यार्थ्यांचा गट तयार करून त्यांच्यात सामाजिक अंतर ठेवून योग्य ती खबरदारी घेऊन कधी घराच्या ओसरीत,पडवीत,गोठ्यात ,झाडाखाली, अंगणवाडीच्या रिकाम्या खोलीत तर काही ठिकाणी अंगणाटत ओट्यावर वर्ग भरवत ज्ञानदानाचे काम सुरू आहे.
“मुलांच्या घरी शिक्षण” या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला जे शक्य होईल ते ज्ञानदानाचे काम आम्ही करतोय आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करतोय याचा आम्हाला समाधान मिळतय.कारण मि पण परिस्थितीशी संघर्ष करुनच स्वप्नपुर्ती केलेली आहे.त्यामुळे परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवाची मुले ही आपल्या मातीशी नाळ जोडून भविष्यातील अधिकारी पदावर जाउन माता बहिणीच्या कष्टाचे चिज होवो हाच एकमेव उद्देश.