उज्वल यशाला दु:खाची किनार…!

पोलीसनामा ऑनलाइन  – माणसाचे जीवन अंनत दुःखाने भरले आहे. एकदा संकटे आले की सतत हात धुवून मागे लागतात,पण त्या दुःखातुन सावरून यश संपादन करून प्रज्ञावंत निर्माण होतात. त्यापैकीच एक कु.रेणुका दिलीप गुंडरे. गेल्या 8-9 वर्षापूर्वी पित्याचा ह्रदय विकार झटक्याने मृत्यू झाला,पित्याचे छत्र हरपले असताना, मोठ्या जिद्दीने अनेक संकटाला सामोरे जात आपल्या आईला घरकामात, शेतात वेळ प्रसंगी रोजगार करून, तिने पायी प्रवास करून मार्च 2020 च्या 10 वी परिक्षेत 93.20% गुण मिळवून यश संपादन केले. पण हे यश पहायला किंवा आपल्या लेकीचे कौतुक करायला आईचं जीवंत राहीली नाही. काल दि 28 रोज मंगळवारी शेतात काम करताना विषारी साप चावून आईचा मृत्यू झाला झाला आणि आज तिचा निकाल…..!

होकर्णा ता जळकोट जि लातूर येथील कु. रेणुका दिलीप गुंडरे या मुलीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा होकर्णा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण पायी प्रवास करून श्री संत गोविंद स्मारक विद्यालय वांजरवाडा येथे या विद्यार्थीनीने मार्च 2020 च्या 10 वी परिक्षेत 93.20%गुण मिळवून यश संपादन केले पण काल दि 28 रोजीचा दिवस तिच्या जीवनात काळरात्र ठरला. आईचा विषारी साप चावून मृत्यू झाला आई गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट हालाकीची. पाठीमागे दोन चिमुकल्या निष्पाप दोन लहान बहिणी. आई-वडिल हे जग सोडून कायमचं निघून गेले. आज 10 वी परिक्षेत यश मिळाले पण तिचे कौतूक करायलाच,पाठीवरून शाबासकीची थाप मारायला घरी कोणी वडीलधारी माणसेच नाहीत. अशातच दोन चिमुकल्या बहिणींना धीर देत मोठ्या हिम्मतीने त्यांना व स्वतःला सावरताना निश्चितच तिला तिच्या आईची नक्कीच उणीव भासत राहणारच.

शेवटी एकच कु.रेणुका गुंडरे हिचे यापुढील शिक्षण अंधातरी राहू नये यासाठी खरचं दानशुर व्यक्ती आणि संस्था यांनी अशा अनाथ निराधार प्रज्ञावंताला सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.
रेणुका गुंडरे चे आई अचानक निघून गेल्याने तिचे सात्वंन करताना नक्कीच कुणाचाही कंठ दाटून आल्या शिवाय राहणार नाही व डोळे भरून आले शिवाय राहत नाहीत..पण तिने 10 परिक्षेत मिळवले यश पाहता. तिचे अभिनंदन करताना सुद्धा डोळे भरून आले शिवाय राहत नाहीत. तिचे खुप-खुप अभिनंदन ती भविष्यात असेच उज्वल यश संपादन करून नक्कीच प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करेल व आईचे राहिलेले स्वप्न पूर्ण करेल. शब्दांकन :लक्ष्मण तगडमपल्ले , होकरणा.