डोंगर पायथ्याशी वसलेल्या वस्तीला तरुणांची ‘साथ’ !

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन : कोरोनाचा वाढता सवसर्ग पाहता गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सतत अहोरात्र झटणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे व टीम तरुणाई महाराष्ट्र यांनी गावकऱ्यांना कोरोना संदर्भात माहिती देऊन आर्सेनिक अल्बा 30 या गोळ्या 600 कुटुंबाना देऊन गावकऱ्यांचे मनोबल वाढवले
सह्याद्री प्रतिष्ठान,टीम तरुणाई मुरबाड विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनामुळे होणाऱ्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुरबाड तालुक्यातील स्थानिक लोकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी दुर्ग गोरखगड,सिद्धगड पायथ्याशी वसलेल्या खोपिवली, नारीवली, धापड पाडा, टाकळी येथील ६०० कुटुंबाना Asernic Album ३० या औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड चे प्रताप गोडांबे, पंकज हरड व टीम तरुणाई च्या नम्रता गोडांबे यांनी सामाजिक उपक्रम राबऊन गावकऱ्यां दिलासा दिला.
सतत गडांच्या संवर्धनासाठी रक्ताचे पाणी करणारे सहयाद्री प्रतिष्ठानचे मावळे कधी थोफ गाडे, बुरुज,महादरवाजे, दुरुस्ती बरोबर शिवरायांचा इतिहास जोपासत शिवकार्य करतांना मात्र कोरोना काळात गडावर संवर्धनासाठी जाता येत नसतांनाही एन वेळेस गडाच्या पयंत्यांसी असलेली गावे ही संवर्धनासाठी जात असताना आसरा देतात याचीच जाण ठेवत सहयाद्री प्रतिष्ठान,टीम तरुणाई मुरबाड यांनी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्या साठी गोळ्यांचे वाटप करून समाधान व्यक्त केले