जेजुरी : वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून बेटी बचाओ उपक्रम

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन –  बेटी बचाओ हा उपक्रम यशस्वी पणे रावबिनाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांची प्रेरणा घेऊन जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा साडी चोळी देऊन सन्मान व मुलीच्या आरोग्यासाठी आरोग्य किट व रोख अकराशे रुपये असा उपक्रम वर्षभर उद्योजक रवींद्र जोशी यांनी जयमल्हार फाउंडेशनच्या संकल्पनेतून सुरु केला आहे .

संपूर्ण देशात मुलींचे प्रमाण कमी आहे. देशभर बेटी बचाओ अभियान चालविले जाते . या अभियानाला चालना देण्यासाठी व मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा सन्मान व्हावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे . जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी व उद्योजक गिरीश राऊत यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळून सलग एक वर्षे जेजुरी ग्रामीण रुग्णालयात मुलीला जन्म देणाऱ्या प्रत्येक मातेचा साडी चोळी देऊन सन्मान व मुलीला आर्थिक मदतीचा उपक्रम सुरु केला आहे .शनिवार दि 6 जून रोजी जेजुरी ग्रामीण रुग्णायात मातेचा सन्मान करून हा उपक्रम सुरू करण्यात आला . यावेळी उद्योजक रवींद्र जोशी, गिरीश राऊत,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रबंध भिसे,डॉ प्रदीप साळवे,जेष्ठ नेते व माजी नगरसेवक रमेश गावडे, माजी व नगरसेवक सुधीर गोडसे, सदानाना बारसुडे, महेश काळे, मुकुंद बेलसरे, गणेश आगलावे, राजेंद्र कुंभार तसेच रुग्ण कल्याण समितीचे डॉ प्रमोद वाघ,अनंत देशमुख, माजी विश्वस्त नितीन राऊत,रामदास जोशी, बाळासाहेब जगताप, संजय खोमणे, नितीन जगताप, सोनू बारसुडे, विलास कड,अविनाश काळे, जयमल्हार फाउंडेशनचे विशाल बारभाई आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक रमेश गावडे,सदानाना बारसुडे, मुकुंद बेलसरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर विशाल बारभाई यांनी या उपक्रमा बाबत माहिती दिली .