वैदूवाडीतील मयुरी बामणे यांचा गरजूंसाठी अन्नदान यज्ञ सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी, रामटेकडी, वैदूवाडी, हडपसर आदी परिसरातील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे कीट दिले. तसेच, माझा परिसर माझी जबाबदारी माझे कर्तव्य या भावनेतून वैदूवाडीमध्ये मागिल 23 मार्च 2020 पासून 118 दिवस भुकेलेल्यांना जेवू घालण्याचा यज्ञ सुरू ठेवला आहे. मानवतेच्या भावनेतून ही सेवा केल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बामणे हिने व्यक्त केली.

जनसेवा फाऊंडेशन आणि साहसी फाऊंडेशनच्या माध्यमातून मयुरी सुरेश बामणे. सुरेश बामणे, मृणाली पवार, नम्रता बामणे, ऋषिकेश बामणे यांनी अन्नदानाचा यज्ञ सुरू ठेवला आहे.

बामणे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था ढासळी आहे. मध्यमवर्गीय नोकरीच्या आधाराने जगत आहे. बांधकाम मजूर, हॉटेल कामगार, वाढपी आदी घटकांची मोठी संख्या आहे. त्यांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले. हातावर पोट असणाऱ्यांकडे काहीच शिल्लक नसते. दिवसभर काम करून सायंकाळी अन्नधान्य खरेदी करून पोट भरत होते. उपासमारीमुळे अनेकांनी जीवन संपवले, अनेक गावाकडे गेले.

अनेकांकडे रेशनिंग कार्ड नाही, त्यामुळे रेशनिंग दुकानदार धान्य देत नाहीत. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरिकांना मदत जाहीर केली आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. निरक्षर आणि निराधारांना कोणी वालीच उरला नाही. पैशांची गरज भासली, तर व्याजानेही मिळतात. मात्र, माणसांची साथ व्याजाने मिळण्याची अद्याप तरी सुविधा सुरू झालेली नाही. त्यासाठी मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हे विसरून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like