गरीब मुलांच्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या धनश्रीची मृत्यूशी झुंज, अनेकांकडून मदतीचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – धनश्री कुंभार हि तरुणी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पुण्यात आली होती. धनश्री हि प्रशासकीय सेवेते रुजू होण्यासाठी आपल्या अभ्यासोबत सामाजिक जबाबदारी म्हणून ती गरिब मुलांसाठी झटत होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच होत. रस्ता ओलंडत असताना एका रिक्षा चालकाने तिला धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि तिच्या डोक्याला मार लागल्याने ती कोमात गेली. हा अपघात शिवणे- उत्तमनगर रस्त्यावर घडला. तो रिक्षा चालक अजूनही फरार आहे.

धनश्री हि मुळची सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणची आहे. ती पुणे मध्ये शिवणे या ठिकाणी राहत होती. धनश्रीने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातुन पदवीचे शिक्षण घेतले तर रानडे इन्सिट्युटमधुन पत्रकारितेचं शिक्षण घेतले होते. या नंतर धनश्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ती अनेक समाजउपयोगी कामेही करत होती. गरिब मुलांना मोफत शिकवणे त्यांच्या अडचणी सोडवणे अशा प्रकराची कामे ती करत होती.

पण अचानक तिचा अपघात झाला. धनश्रीवर नवले हॉस्पीटलमध्ये उपचार चालू आहेत. तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज भासत आहे. ती सध्या कोमात आहे पण तिच्या बोटांची हालचाल होत आहे. तिच्या उपचारांसाठी १५ लाखांची गरज आहे. धनश्रीने समाजासाठी तिच्या परीने १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने पुढे येऊन तिला आर्थिक मदत करण्याची सध्या गरज आहे.

गुगल पे नंबर – 9922778408 (सुनिल कुंभार- धनश्रीचे वडील), Sunil Anant Kumbhar, Bank of India, Branch Warje Malwadi (Pune), SAVING ACCOUNT NO. 053310110008792, IFSC : BKID0000533