तळेगाव ढमढेरे येथील महिलेच्या डोक्यावरील जट काढली : नंदिनी जाधव

पुणे : प्रतिनिधी –  सामाजिक बंधनामुळे महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातीलच एक डोक्यावरील जड आहे. रुढी-परंपरेच्या नावाखाली त्यांचा छळ होतो. मात्र, आता अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जड असलेल्या महिलांचे प्रबोधन करून जड काढण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत 167 महिलांच्या डोक्यावरील जटमुक्त केल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा, कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी सांगितले.

सुनीता गोपाळे (वय 40, तळेगाव ढमढेरे) असे जटमुक्त केलेल्या महिलेचे नाव आहे.

जाधव म्हणाल्या की, तळेगांव दाभाडे (ता. मावळ) येथील सुनिता गोपाळे हिच्या डोक्यात 12 वर्षाच्या असताना जट आली. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर तिचे लग्न झाले, दोन मुले झाली. मात्र दुर्दैवाने एका मुलाचा मृत्यू झाला, त्यामुळे सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले. दोन वेळचे जेवण आणि जगायचे असा गंभीर प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. धुणीभांडी करावीत, तर जट असल्याने कोणी काम देईना अशी अवस्था तिची झाली. अखेर बिगारी काम करून उदरभरण सुरू केले. मात्र, दुसरीकडे जट वाढत होती. जट काढण्यासाठी साठ हजार रुपये खर्च येणार होता, त्यामुळे खर्च करण्याची परिस्थिती नव्हती. मागिल 28 वर्षांपासून त्या जटेचे ओझे वाहत होत्या.

दरम्यान, तळेगांव ढमढेरे गावातील एका महिलेचे जट निर्मूलन केलेल्या सुमन यांनी सुनीताच्या डोक्यातील जट पाहिली. तिला विचारले तुझ्या डोक्यावरील जट काढायची असेल, तर मदत करते. त्यांनी तातडीने अंनिसच्या नंदिनी जाधव यांना माहिती दिली. जाधव यांनी देहुरोड येथील अनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांना माहिती दिली. त्यानंतर सुनिता बिगारी काम करत होत्या तिथे पोहोचलो, तेथे जट काढण्यास विरोध केला. जवळच असलेल्या मंदिर परिसरातील शिल्पा सावंत यांच्या परवानगीने घेऊन सुनिताच्या डोक्यातील जट काढण्यात आली, असे जाधव यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख, दादासाहेब लाड, शिल्पा सावंत उपस्थित 168 व्या महिलेची जटेतुन मुक्तता केली.