समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याला ५० हजाराची लाच घेताना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

तपासणी अहवालावर अनुकुल शेरा देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना सामाजकल्याण विभागाच्या उप आयुक्तांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. या घटनेमुळे समाजकल्याण विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

पुंजी सखाराम कवटे (वय- ५६ रा. बालाजी नगर, वारजे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या समाजकल्याण विभागाच्या उप आयुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7b7c379-bdaf-11e8-858b-fba931c15bbe’]

तक्रारदार यांची शिक्षण संस्था आहे. संस्थेमार्फत ते अनुदानीत आश्रमशाळा चालवतात. पुंजी कवटे यांनी त्यांच्या शाळेची तपासणी केली होती. तपासणी अहवालावर अनुकुल शेरा देण्यासाठी पुंजी यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार शुक्रवारी एसबीच्या पथकाने सापळा लावला. त्यात तक्रारदाराकडून पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पुंजीयाला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिलीप बोरास्ते, उप अधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक सुरेखा घारगे यांच्या पथकाने केली.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c679130f-bdaf-11e8-a65d-ab2ddab2e24e’]

सरकारी काम करण्यासाठी कोणताही लोकसेवक, लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आहवाहन लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केले आहे.