काय सांगता ! होय, समाज कल्याण उपायुक्तांनी केलं तब्बल 64 मनोरूग्णांचं ‘केसकर्तन’

पोलीसनामा ऑनलाईन टीम राज्यभरात कोरोनामुळे अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, पोलिस, सेवाभावी संघटनांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर फिरणार्‍या मनोरुग्णावर उपासमारी ओढवल्याचे कळताच बीडचे समाज कल्याण उपायुक्तांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने शहरात फिरणार्‍या तब्बल 64 मनोरुग्णांना निवारागृहात आणले. त्यांनतर मनोरुग्णांचे वाढलेले केस कापून, स्वच्छता करून माणुसकी जपली आहे. सचिन मडावी असे उपायुक्तांचे नाव आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे सलुनचे दुकाने बंद असल्याने मडावी यांनी स्वतःच हातात कात्री घेऊन निराधार, मनोरुग्णांचे केशकर्तन केले. हॉटेल बंद असल्याने या मनोरुग्णाची उपासमार होऊ नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी अन्नधान्यांची सोय केली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भीती व व संचारबंदी मुळे कोणीच या बेवारस लोकांचे केस कापण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. याची माहिती समाज कल्याण उपायुक्त डॉक्टर सचिन मडावी यांना समजली. त्यानंतर मडावी यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शहरात रस्त्यावर फिरणार्‍या तब्बल 64 मनोरुग्णांना शोधून त्यांचे केस स्वतः कापले आहेत. प्रशासनातील प्रमुख अधिकारी पदावरील मडावी यांनी कठिण काळात मनोरूग्णासाठी केलेल्या कामाने प्रशासकीय यंत्रणेने कौतुक केले आहे.