कर्तव्य फाऊंडेशनकडून समाजसेवक अब्दुल करीम मोलू यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

पुणे: कर्तव्य फाउंडेशनतर्फे समाजसेवक अब्दुल करीम मोलू यांना कोरोना योध्दा सन्मान देऊन गौरविण्यात आले. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अशोक देशमुख व सामाजिक कार्यकर्ते मन्सूर शेख यांच्या हस्ते त्यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व सदस्य मोहसीन शेख उपस्थित होते.

अब्दुल करीम मोलू यांनी झरीना मोलू एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना व संस्थाना शैक्षणिक मदत केली आहे तसेच कोरोना लाँकडाऊनच्या काळात कच्छी मेमन जमातच्या माध्यमातून पुणे शहरातील बेघर नागरिकांसाठी अन्नदान तसेच गरजू कुटुंबांना कीराणा साहित्य वाटप तसेच मास्क व सँनेटायझर वाटप आदी समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दा सन्मान दिल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी सांगितले.