‘शरद पवार यांच्या मनाचा मोठेपणा, 3 मंत्री घेऊन भेटायला आले’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हमाल मापाडी प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी खरंच मनाचा मोठेपणा दाखविला आणि तीन मंत्री घेऊन ते भेटायला आहे. त्यामुळे समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी आज दिली. पहिल्यांदाच इतकी संवेदनशीलता कोणीतरी दाववल्याचेही त्यांनी सांगितले.

मार्केटयार्डात निसर्ग सभागृहामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मार्केटयार्डात दीड तास झालेल्या या बैठकीत शरद पवार यांनी सर्व मुद्दे बारकाईने ऐकून घेतले. त्यात योग्यवेळी त्यांनी अधिकारी, मंत्री यांनाही खुलासा करण्यास सांगितले. निर्णय घेण्यात अडचणी काय आहेत, अशीही विचारणा त्यांनी यावेळी केली. तसेच तात्काळ निर्णय घेण्याच्याही सूचना दिल्या. मंत्र्यंबरोबर तिन्ही खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.  या बैठकिला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना डॉ. बाबा आढाव म्हणाले, हमाल-मापाडींच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच कोणी तरी इतकी संवेदनशीलता दाखवली आहे. माझ्या वयाचा विचार करून पवार तीन मंत्री घेऊन भेटायला आले. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसला. तसेच वळसे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यात एक महिन्यात हमाल मापाडी मंडळ स्थापन झाले. तर अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही संपेल आणि कष्टकऱ्यांच्याबाबत नव्या पर्वाला सुरुवात होईल, अशी अपेक्षाही आढाव यांनी व्यक्त केली.