Nagpur : 36 वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या महिलेला ओढलं जाळयात, देश-विदेशच्या गप्पा मारून तिच्याच बंगल्यात केलं वास्तव्य अन्…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेला आपला बिझनेस असून 25 राष्ट्रांमध्ये नेटवर्क असल्याची थाप मारुन तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्याकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर दिला बेदम मारहणा केली. याप्रकरणी एका युवकाला सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

अमोल उर्फ सक्षम मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर नागपूरमधील महिलेशी अनैसर्गिक कृत्य करुन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन सोनेगाव पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा महिलेच्या घरी खोली भाड्याने घेण्याच्या नावाखाली आला होता. त्याने स्वत:ला देश-विदेशात राहत असल्याचे तसेच आपला बिझनेस असून 25 राष्ट्रांत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही महिला त्याच्या थांपाना भाळली. त्यानंतर त्याने 2020 मध्ये महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तो तिच्याच बंगल्यावर राहू लागला. तो अनैसर्गिक संबंधासाठी बळजबरी करायचा. नकार दिला असता तो तिला बेदम मारहाण करत होता. त्याने महिलेकडे 10 लाख रुपये व्यवसायासाठी मागितले. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिल्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्ररीत केला आहे.