कोरोना काळात अचानक वाढली सोफ्याची मागणी; कारण जाणून व्हाल थक्क…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या बहुतांश लोक घरातच आहे. अनेक लोक घरातून काम करत आहेत तर काही लोक घरी बसून आहेत. यामध्येच लोकांनी होम डेकोरकडे विशेष लक्ष दिले आहे. विशेषत: आरामदायी सोफा. सोफा खरेदी करण्याचा विचारही अनेकांकडून सुरु आहे. परिणामी, सोफ्याची मागणी वाढली आहे.

गोदरेज इंटिरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुबोध मेहता यांनी सांगितले, की ‘फर्निचर कॅटेगरीमध्ये 2 ते 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी वर्क फ्रॉम होम प्रोडक्ट्सची विक्रीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. सध्या पुरुष जास्त वेळ घरामध्ये आहेत. त्यामुळे खरेदी करण्यात त्यांची रूची वाढली आहे. याचदरम्यान फर्निचरची विक्री 300 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये खर्च्या आणि डेस्कची मोठ्या प्रमाणात विक्री वाढली होती. मात्र, ही महामारी अद्याप गेलेली नाही.

सध्या सोफा, बिन बॅग्ज्, स्टोरोज सोल्यूशन आणि होम डेकोरची सर्वात जास्त मागणी आहे. देशांतील अनेक राज्यांत लॉकडाऊन असला तरीही यावर्षी फर्निचर वस्तूंची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असू शकते, असाही अंदाज लावला जात आहे.