सना खान सोबत तुलना केल्यानं भडकली सोफिया हयात; म्हणाली ‘3 वर्षांपासून नाही केला सेक्स !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक्स टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता, तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. यानंतर सना खानची तुलना बॉलिवूड स्टार आणि बिग बॉस 7 ची स्पर्धक सोफिया हयात (Sofia Hayat) सोबत केली जात होती. यावर आता सोफिया हयातनं प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत बोलताना सोफिया हयात म्हणाली, मी आता माझी आणि सनाची तुलना केली जात असल्यानं परेशान झाले आहे. लोकांना नेमकं काय झालंय ? त्यांना वाटतं की अध्यात्माचा अर्थ फक्त कपड्यांशी संबंधित आहे. मी जेव्हा नन झाले होते तेव्हा तीन वर्षे सेक्स केला नव्हता. आताही मी ननचे पूर्ण कपडे घालत नाही. पूर्ण कपडे घालण्यापेक्षा मी न्यूडिटीमध्ये जास्त आध्यात्मिक आहे.

सनाला एकटं सोडा
पुढं बोलताना सोफिया म्हणाली, लहान मेंदू आणि लहान विचार असणारी लोकं ही गोष्ट समजू शकत नाहीत. मी 3 वर्षांपासून सेक्स केलेला नाही. मी आताही मां सोफिया आहे आणि आताही आध्यात्मिक आहे.

सनाचा बचाव करताना सोफिया म्हणते की, सनाला एकटं सोडा. जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा डोकं झाकून जाता; परंतु मंदिरातून परत येता तेव्हा डोकं उघडं ठेवून येता. तुम्ही फसवे आहात. संपूर्ण जग एक मंदिर आहे.

You might also like