पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड  :  पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चिंचवडच्या बिजली नगर येथे घडली. राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपविले अद्याप आत्महत्याचे कारण समजले नाही.

अभिजित रामदास मुळे वय-३८ रा.गिरिराज सोसायटी बिजली नगर चिंचवड अस गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,अभिजित रामदास मुळे या इसमाने राहत्या घरी साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली,त्यावेळी घरात कोणी नव्हते.अभिजित हे टी.सी.एस कंपनीत संगणक अभियंता होते अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.काही वर्षांपूर्वीच मयत अभिजित चा विवाह झाला होता,घरात छोटा भाऊ आणि पत्नीसह ते चिंचवड येथे राहात होते.मात्र आज सकाळी घरी कोणी नसताना अभिजित ने गळफास घेऊन आत्महत्या केली.अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de0d2f3d-9c9b-11e8-aef6-f11ab7ec3e92′]